लग्नाच्या खरेदीसाठी ठेवलेले 7 लाख घरातून लंपास

44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg

पुणे : लग्नाच्या खरेदीसाठी घरात ठेवलेली रक्कम भर दिवसा चोरट्याने घरात घुसून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना कात्रज परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आकाश गोरख फाटे (वय 24 , रा. हेमी प्लाझा, किनारा हॉटेलजवळ, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कात्रज परिसरातील संतोषनगर भागात असलेल्या सागर अपार्टमेंटमधील एका सदनिकेमध्ये राहतात. आकाश यांच्यासमवेत त्यांचे आई-वडील सदनिकेमध्ये राहतात. आकाश यांचा विवाह नुकताच ठरला आहे. येत्या काही दिवसात त्यांचे लग्न होणार आहे. लग्नामध्ये लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तु व खरेदीसाठी आकाश यांनी यांनी बॅंकेतुन सात लाख रुपये काढून ते घरामधील कपाटात ठेवले होते. शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी चार या वेळेत घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी चोरट्यांनी घरात घुसून कपाटामध्ये ठेवलेली सात लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली. या घटनेनंतर आकाश यांनी थेट पोलिस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली.

घराविषयी माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच पैसे चोरले असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस निरीक्षक विष्णू पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाखेचे विष्णू ताम्हाणे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरवात केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड करत आहेत.


 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com