जुन्नर येथील प्राचीन जैन मंदिरात चोरी

दत्ता म्हसकर
बुधवार, 5 डिसेंबर 2018

जुन्नर : जुन्नर शहरातील पंणसुबा पेठ ता. जुन्नर येथील शांतीनाथ मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत नरेद्र भोगिलाल शहा यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी सांगितले, की 20 आणि 21 नोव्हेंबर तसेच 4 आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान चोरीच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांत सुमारे सहा हजार रुपये किमतीचा पितळी कळस, दोन हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुकूट आणि पाच हजार रुपये किमतीची छत्री चोरीस गेली आहे. 

जैन समाजाचे हे प्राचीन मंदिर असून, अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करुन तांब्याचा मुकूट व त्यावरील छत्री व मंदिरावरील कळस चोरुन नेले आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वाय. के. नलवडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Theft in the ancient Jain temple of Junnar