एटीएम मधील चोरीचा डाव फसला

दत्ता म्हसकर
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

जुन्नर : श्री क्षेत्र ओझर (ता.जुन्नर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील एटीएम मशीन मधून पैसे काढण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना आज गुरुवारी (ता.02) पहाटे घडली. यात एटीएम मशीनचे नुकसान झाले. यापूर्वी श्री क्षेत्र ओझर येथे अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी रात्रीच्या वेळी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिराच्या दक्षीण बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी प्रवेश केला परंतू मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच तेथून पळ काढला.

नंतर त्यांनी आपला मोर्चा ओझर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळविला. सुरूवातीला त्यांनी बँकेच्या समोर असलेला सीसीटीव्ही कँमेरा फोडला परंतू दुसऱ्या सीसीटीव्ही कँमेरा त्यांच्या लक्षात न आल्याने त्यात हा सर्व प्रकार टिपला गेला त्यानुसार पहाटे 4.17 ते 4.44 या वेळेत पाच अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. यावेळी चोरट्यांनी एटीएमची फोडतोड केली परंतू मशीनचा कँशवाँर्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम लांबविता आली नाही. चोरट्यांनी बँकेचा दरवाजा उचकटण्याचा प्रयत्न केला परंतू त्यामध्ये त्यांना अपयश आले.

बँकेचे साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाच ओतूर येथील भर वस्तीत असलेली दोन सराफी दुकाने 15 जुलै ला फोडून लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्या घटनेतील चोरांचा या घटनेशी सबंध असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Theft in ATM is unsuccessful