कारचालक चोरट्यांचे टार्गेट

Crime
Crime

पुणे - कारमधील ज्येष्ठाला ऑईल गळत असल्याचे सांगून चोरट्यांनी पाठीमागील सीटवर ठेवलेला पावणेदोन लाखांचा ऐवज पळवून नेला. रविवारी दुपारी महात्मा गांधी रस्त्यावर ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना शहरात वाढत आहेत.

कारचालकांना लुटणारी टोळी सक्रिय? 
सिंहगड रस्ता परिसरात रस्त्याच्या कडेला कार थांबवून मोबाईलवर बोलणाऱ्या एका महिलेस दुचाकीवरील चोरट्यांनी गाडीचे चाक पंक्‍चर झाल्याचे सांगत पाठीमागच्या सीटवर ठेवलेली लाखो रुपयांचा ऐवज असलेली बॅग पळविली होती. त्यापाठोपाठ डेक्कन परिसरात एका कृषी अधिकाऱ्याच्या गाडीतील बॅग अशाच पद्धतीने पळविल्याची घटना नुकतीच घडली होती. शहराच्या वेगवेगळ्या भागांत कारचालकांना लुटणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची चिन्हे आहेत.

अशी घेता येईल काळजी 
कारचे दरवाजे व्यवस्थित बंद (लॉक) करा
कारजवळ येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका
कारमध्ये रोकड, मौल्यवान वस्तू, कागदपत्रे ठेवू नका 
कारभोवती संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com