esakal | पुण्यात सात लाखांच्या कपड्यांची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

thief.jpg

कोरेगाव भीमा (पुणे) : पेरणे फाटा येथे चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गजलक्ष्मी कलेक्‍शन या कपड्याच्या दुकानात मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7 लाख 10 हजार रुपये किमतीच्या कपड्यांची चोरी केली. 

पुण्यात सात लाखांच्या कपड्यांची चोरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा (पुणे) : पेरणे फाटा येथे चौकात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गजलक्ष्मी कलेक्‍शन या कपड्याच्या दुकानात मध्यरात्री शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7 लाख 10 हजार रुपये किमतीच्या कपड्यांची चोरी केली. 

याबाबत लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरणे फाटा (ता. हवेली) येथे मुख्य चौकाजवळ प्रज्ञा कदम व अर्चना ढवळे यांचे गजलक्ष्मी कलेक्‍शन हे कपड्यांचे दुकान आहे. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास मोटारीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी चौकातील हायमास्ट दिवा बंद केला. त्यानंतर चौकातील गजलक्ष्मी कलेक्‍शन या कपड्याच्या दुकानासमोर मोटार आडवी लावून अडीच वाजता शटर उचकटून कपडे व साड्यांची चोरी केली. यात 7 लाख 10 हजार रुपयांचे कपडे चोरीस गेले आहेत.

पुरावा मागे राहू नये, यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेचा रेकॉर्डरही चोरून नेला आहे. दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीचा तपास सुरू केला आहे. 

loading image
go to top