शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तांब्याच्या तारांची चोरी

राजकुमार थोरात
शनिवार, 1 डिसेंबर 2018

ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी- श्रीगणेश कानगुडे...
शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तांब्याच्या तारा चोरी करणारे चोरटे स्थानिक असून शेतकऱ्यावर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोरी करीत असल्याने पाेलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,गावकऱ्यांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. तसेच संशयित चोरट्यांची नावे पोलिसांना सांगण्याचे आवाहन केले.

वालचंदनगर : चिखली (ता.इंदापूर) परीसरातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तारा चोरी करण्याचा चोरट्यांना सपाटा लावला असून चोरीमुळे शेतकरी अडचणीमध्ये येवू लागले आहेत.

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये गेल्या तीन -चार वर्षापूर्वी विद्युत पंपातील तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या टोळीने धुमाकुळ घातला होता. वालचंदनगर पोलिसांनी कारवाई करुन चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर विद्युत पंपातील तारा चोरीच्या घटना थांबल्या होत्या. मात्र पुन्हा चालू वर्षापासुन चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून विद्युत पंपातील तांब्याच्या तारांची चोरी घटनामध्ये वाढ झाली आहे. चिखली परीसरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसामध्ये बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तांब्याच्या तारांची चोरी झाली आहे. यामध्ये पोपट अर्जुन, तुकाराम कुंभार ,दत्तात्रेय कुंभार, गुणवंत दळवी, शिवाजी रिटे, विलास शेंडगे ,गणपत पांढरे , दत्तात्रय भोसले ,बाळासो रूपनवर या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

लासुर्णे, बोरी, जंक्शन, बेलवाडी परीसरातील शेतकऱ्यांच्या अनेक विद्युत पंपातील तांब्याच्या तारांची चोरी झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.  सध्या पाण्याची टंचाई जाणवू लागली असून शेतकरी पिकांना उपलब्ध असलेले पाणी देवून पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.यामध्येच विद्युत पंपातील तारा चोरीमुळे शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद राहत असून पिके जळण्याचा ही धोका निर्माण झाला आहे. एका शेतकऱ्यांना पंप दुरुस्तीसाठी अडीच ते चार हजार रुपयांचा खर्च येत असल्यामुळे ऐन दुष्काळामध्ये  नाहक त्रास सहन करावा लागत अाहे. 

ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी- श्रीगणेश कानगुडे...
शेतकऱ्यांच्या विद्युत पंपातील तांब्याच्या तारा चोरी करणारे चोरटे स्थानिक असून शेतकऱ्यावर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोरी करीत असल्याने पाेलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.यासंदर्भात वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,गावकऱ्यांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी. तसेच संशयित चोरट्यांची नावे पोलिसांना सांगण्याचे आवाहन केले.

Web Title: Theft of copper wire in the electricity pump of the farmers in Indapur