थेरगावमध्ये पावणेतीन लाखांची चोरी 

संदीप घिसे 
रविवार, 29 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दोन लाख ८८ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना थेरगाव येथे घडली. जबरराम नवाराम प्रजापती (वय २९, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापती यांचे डांगे चौक, थेरगाव येथे शिवम मोबाइल नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजता प्रजापती यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांनी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून आतील दोन लाख ८८ हजार रुपयांचे २८ मोबाइल व रोख रक्कम चोरून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम याबाबत अधिक तपास करीत आहेत.
 
Web Title: Theft of lakhs of thieves in Thergaon