बोपोडीत कामगारानेच केली लाखोंची चोरी

बोपोडीत कामगारानेच केली लाखोंची चोरी

पुणे (औंध) - घरमालक देवदर्शनाला बाहेरगावी गेल्याची संधी साधून बोपोडी येथील भाऊ पाटील रस्त्यावरील कुंदन इस्टेट सोसायटीत कामगारानेच पत्नी व दोन सहका-याच्या मदतीने साडे चौतीस लाखाचा ऐवज चोरला. घरमालक आशिष भवरलाल जैन यांच्या तक्रारीवरुन बोपोडी येथे राहणा-या मुकेश सिंग (30 वर्षे), पारो मुकेश सिंग (23वर्षे), केसर साई (30) यांच्या विरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

खडकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आशिष जैन हे कुटूंबासह दिवाळी सुट्टीत देवदर्शनाला गेले असता मुकेश सिंग व त्याच्या पत्नीने दोन सहका-यांसह संगनमताने बंगल्यातील खोलीचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. आतील बेडरुममधील कपाट व लकर तोडून हिरे, सोन्याचे दागिने, व रोख रकमेसह एकूण साडे चौतीस लाखाचा ऐवज चोरुन नेला. एकूण ऐवज चोरुन नेत असतांना बंगल्याच्या सुरक्षारक्षकाने हे पाहिल्याने हा प्रकार उजेडात आला. व जैन कुटूंबीय परतल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

चोरी करुन पळून गेलेल्या मुकेशसह त्याची पत्नी व अन्य दोन सहकारी हे नेपाळचे असून, त्यांच्या शोधासाठी तपास पथक पाठवण्यात आल्याचेही वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहिते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com