खासगी बस प्रवासादरम्यान साडेसात लाखांची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - खासगी बसने वाशीम ते पुणे प्रवास करणाऱ्या वृद्ध दांपत्याच्या बॅगेचे कुलूप तोडून सोने व रोकड असा तब्बल साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरांनी पळवला. 

याप्रकरणी सुरेखा नलावडे (वय 57, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नलावडे या त्यांच्या पतीसमवेत कामानिमित्त वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथे गेले होते. तेथून शनिवारी खासगी बसने पुण्याकडे निघताना नलावडे यांनी आपल्या बॅगेत 6 लाख 67 हजार रुपयांचे दागिने, 97 हजारांची रोकड असा 7 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज ठेवला होता. 

प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेचे कुलूप तोडून त्यामधील ऐवज लांबवला. नलावडे पुण्यात उतरल्यानंतर त्यांनी बॅगेची तपासणी केली. त्या वेळी बॅगेचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नलावडे यांनी खासगी बसच्या वाहकासह पाच प्रवाशांवर संशय घेतला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: theft of seven hundred million private bus journey