दुचाकी चोरण्याची अनोखी "नशा' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे -दारूच्या नशेत महागड्या दुचाकी चोरणाऱ्यास अलंकार पोलिसांनी मंगळवारी जेरबंद केले. मद्यपान केल्यानंतरच केटीएम ड्यूक, बुलेट, अपाची अशा महागड्या दुचाकी चोरण्याचे वेड या चोरट्यास होते. त्याने शहराच्या विविध भागांत साडेचार लाखांच्या सहा दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून पावणेदोन लाखाच्या केटीएम ड्यूकसह आणखी दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. 

धवल ललित ठक्कर (वय 39, रा. धवल बंगलो, मिलन सोसायटी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिस सचिन बुधावले व गणेश दळवी कोथरूड हद्दीत झालेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करीत असताना परिसरात एक दुचाकीचोर येणार असल्याची माहिती त्यांना खबऱ्याकडून मिळाली. अलंकार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक रेखा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अंबरीश देशमुख, गणेश माने, राजेंद्र सोनवणे, प्रमोद मोहिते, नवनाथ शिंदे, नितीन पडवळ यांच्या पथकाने सापळा रचून ठक्करला ताब्यात घेतले. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत ठक्कर याने दारूच्या नशेत कोथरूडमधून एक अपाची, एक स्प्लेंडर, डेक्कन भागातून एक केटीएम ड्यूक, एक अपाची, तर हिंजवडीमधून रॉयल एन्फिल्ड बुलेट व आणखी एक दुचाकी अशा साडेचार लाख रुपये किमतीच्या सहा महागड्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. 

नैराश्‍यातून व्यसन 
ठक्कर हा उच्चशिक्षित असून त्याची कौटुंबिक परिस्थितीही चांगली आहे. एका व्यवसायात तोटा सहन करावा लागल्याने ठक्करला नैराश्‍य आले, त्यातूनच दारूचे व्यसन वाढले. पुढे मद्यपानानंतर महागड्या दुचाकी चोरण्याचा प्रकार सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Theft of a two-wheeler in pune