...तर पुण्यातील 'या' कंपन्या जाणार शांघायला

pune
pune

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत.  सध्या येणाऱ्या अडचणी तातडीने न सोडविल्यास पुण्यातील कंपन्या चीनमध्ये शांघाय येथे स्थलांतरीत करण्याचा इशारा जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली.
 

कंपन्यांना आवश्‍यक पायाभूत सुविधा पुरविण्यासोबतच काही ठिकाणी माथाडी कामगार संघटनेकडून होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्ह्यात चाकण, रांजणगाव, भोसरी एमआयडीसीसह इतर औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात काही भागांत कंपन्यांमधील अधिकाऱ्यांना होणारा त्रास, वाहतुकीची समस्या, पाणी, घनकचरा व्यवस्थापन यांसह अन्य मुद्यांचा समावेश होता.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जर्मनीचे भारतातील वाणिज्य प्रतिनिधी (कॉन्सुलेट जनरल) डॉ. युरगॅन मोरहार्ड, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, समीक्षा चंद्राकर, प्रादेशिक अधिकारी आदिनाथ हतगल, मावळचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे, खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली आदी या वेळी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com