...तर मी यापेक्षाही उत्तम काम केले असते : विक्रम गोखले

...तर मी यापेक्षाही उत्तम काम केले असते : विक्रम गोखले

पुणे : "मी प्रकाशात राहावं म्हणून माझ्यासाठी पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक लोकांचा आज सन्मान होत आहे, याचा मला आनंद आहे. देशभरातील लोकांनी माझ्या कामासाठी मला प्रेम दिलं. तुमचं हे प्रेम मला आधी कळलं असतं, तर मी याहूनही अधिक उत्तम काम केलं असतं,'' अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी "कलाकृतज्ञता पुरस्कार' स्वीकारताना व्यक्त केली. 

कलासंस्कृती परिवारातर्फे आयोजित "स्टार ऑफ स्क्रीन' या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कलासंस्कृती परिवाराचे अध्यक्ष वैभव जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, परिवाराचे उपाध्यक्ष माधव अभ्यंकर, मंगेश नगरे, सचिव विनय जवळगीकर, खजिनदार प्रवीण वानखेडे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय ठुबे, राज काझी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी आपल्या खास शैलीत पुणेकरांशी संवाद साधला. 

गोखले यांना "कलाकृतज्ञता पुरस्कार', आमदार उल्हास पवार यांना "समाज संस्कृती पुरस्कार', किशोर पंडित, बाळासाहेब शिंदे आणि शुभांगी दामले यांना "निकोप सेवा पुरस्कारा'ने जॅकी श्रॉफ, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेते अजिंक्‍य देव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी चित्रपटाच्या पडद्यामागील तंत्रज्ञ, कलाकारांना "स्टार ऑफ स्क्रीन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये स्पॉटबॉय, सेटिंगबॉय, लाइटबॉय, ड्रेसमन, हेअरड्रेसर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, प्रॉडक्‍शन मॅनेजर, प्रॉडक्‍शन असिस्टंट, पी. आर., कॅमेरा असिस्टंट यांचा समावेश होता. त्यांना स्मृतिचिन्ह आणि दोन लाख रुपयांचा फॅमिली मेडिक्‍लेम विमा देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन योगिनी पोफळे यांनी केले. 

सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण 

याप्रसंगी मल्लखांब, योगासने, नृत्य, स्कीट आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. महाराष्ट्र मंडळाच्या मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर केली, त्यांना विक्रम गोखले यांनी 11 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com