'त्यांच्या'पासून मुस्लीम समाजाने दूर रहावे: डॅा. फौजीया खान

डी. के. वळसे पाटील
शनिवार, 23 जून 2018

मंचर (पुणे) : 'स्वातंत्र्य मिळण्यासाठी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रीत लढा दिला. लोककल्याणासाठी लोकशाही आणून प्रत्येकाला विचाराचे स्वांतत्र मिळाले. त्यातून शांतता, ऐक्यता, प्रेम भावना निर्माण होऊन देशाला विकासाच्या मार्गाने नेणे गरजेचे आहे. पण ताकदीच्या जोरावर व्देष भावना निर्माण करून जाती धर्मात दरी तयार करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करतात. त्यांच्यापासून मुस्लीम समाजाने दूर रहावे.' असे आवाहन राष्ट्रवादी-काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॅा. फौजीया खान यांनी केले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलीक, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, विवेक वळसे पाटील, शरद लेंडे, पांडूरंग पवार, मुनीर शेख, हाजी मन्सुर पठाण, शहानूर शेख, आर. के. मोमीन, बादशहा इनामदार, आंबेगाव, शिरूर व जुन्नर येथील मुस्लीम बांधव उपस्थीत होते.

मलीक म्हणाले की, 'इस्लाम धर्माची माहिती समाजापर्यंत पोहचविण्याची गरज असून गैरसमज पसरून व्देष निर्माण केला जात आहे. मुलीला वडीलांच्या मालमत्तेचा अधिकार कुराण मध्ये यापुर्वीच दिला आहे. हिंदू मुस्लीम ऐकता निर्माण व्हावी यासाठी ईद मिलनचा कार्यक्रम होतात. त्याच बरोबर दिवाळी मिलन चा कार्यक्रम मुस्लीम बांधवांनी करावा.'

वळसे पाटील म्हणाले, 'समाजात व्देष भावनेतून धर्माधर्मात सर्वसामान्य जनता विभागण्याचे काम होऊ लागले आहे. गेली 25 वर्षापासून ईद मिलनचा कार्यक्रम मंचरला साजरा केला जातो. येथील हिंदू मुस्लिमांचे ऐक्य वाखाण्यासारखे आहे.'

पोपटराव गावडे, अतुल बेनके, मौलाना फरीद, अल्लु इनामदार, राजू इनामदार, नासीर शेख, डॅा. समीर पठाण यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन तांबोळी समाजाचे शिरूर तालुका अध्यक्ष युनूस तांबोळी यांनी केले. खलीद इनामदार यांनी आभार मानले.

Web Title: then muslim community should stay away says dr fauzia khan