...तर राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही : दत्तात्रय काळे

राजकुमार  शहा
रविवार, 13 मे 2018

दूध दरवाढीसाठी यापूर्वी अनेक अांदोलन झाली पण प्रशासनाला जाग आली नाही जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये दर द्या, शिवक्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

मोहोळ : दूध दरवाढीसाठी यापूर्वी अनेक अांदोलन झाली पण प्रशासनाला जाग आली नाही जगाचा पोशिंदा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. गायीच्या दुधाला 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 50 रुपये दर द्या, शिवक्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. येत्या आठवड्याभरात दूध दरवाढीचा निर्णय न घेतल्यास राज्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही, असा इशारा शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी दिला. 

दूध दरवाढीसाठी संघटनेच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ येथे रस्त्यावर दूध ओतून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूरज मोरे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष गहिनीनाथ भांगे, माढा तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, जिल्हा संघटक नागेश नरळे, शेटफळ अध्यक्ष सचिन वागज, सचिन गुळमे सारंग शिंदे, प्रशांत मोरे, गणेश मोरे, भारत मोरे, प्रतीक कदम, बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश भोसले,  रोहित मोरे, नितीन भोसले, भाऊसाहेब मोरे, संजय शिंदे, सिध्देश्वर मोरे, संभाजी पाटील, संतोष मोरे यांनी सहभाग नोंदविला. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार किशोर बडवे यांना देण्यात आले.

Web Title: Then will not allow any minister to run in the state says Dattatray Kale