पुण्यात अजूनही दोन हजार खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road

पुण्यात अजूनही दोन हजार खड्डे

पुणे - गेल्या वर्षभरापासून पुणेकर रस्त्यांमधील खड्ड्यांमधून कसरत करीत मार्गक्रमण करीत असताना रस्ते खोदाई मात्र सुरूच आहे. असे असताना गेल्या चार महिन्यांत महापालिकेच्या पथ विभागाने ९ हजार खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. अद्यापही २ हजारांपेक्षा अधिक खड्डे बुजविण्याचे काम बाकी आहे. 

एकीकडे रस्ते खोदाईमुळे रस्ते खराब झालेले असताना दुसरीकडे डांबरीकरण केलेल्या रस्त्याची मुदत संपणे, डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करणे, खड्ड्यातील माती, दगड न काढता तसेच डांबर टाकणे, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था न करता डांबरीकरण करणे आदी कारणाने रस्ते खराब होत आहेत. पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्त्याची डागडुजी, खड्डे बुजविणे यासह इतर कारणासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय सुमारे १.२५ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. मुख्य पथ विभागाकडे शहरातील १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते येतात, तर त्याखालील रस्त्यांची जबाबदारी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे.

Web Title: There Are Still Two Thousand Pits In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsRoad Development
go to top