पुरंदर तालुक्यात रुग्णांलयामध्ये `जनआरोग्य योजने`चा लाभच नाही

कोरोना तिसऱया लाटेच्या तोंडावर पुन्हा प्रश्न ऐरणीवर., जिल्ह्यात 75 रुग्णालयांत सोय.. पण पुरंदरला नाही

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाsakal

सासवड : शिधापत्रिका धारक गरजू व सामान्य रुग्णांसाठी `महात्मा फुले जनआरोग्य योजने`च्या लाभासाठी पुणे जिल्ह्यातील तब्बल 75 रुग्णालये आहेत. मात्र पुरंदर तालुक्यातील एकही रुग्णालय या योजनेशी जोडले गेलेले नाही. त्यामुळे कोरोनासह विविध 996 प्रकारच्या आजारांच्या उपचारात पुरंदर तालुक्यात गरजू रुग्णांना प्रत्येकी दिड लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा लाभ घेत येत नाही., ही बाब पुन्हा एकदा तिसऱया कोरोना लाटेच्या तोंडावर ऐरणीवर आली आहे.


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
पुणे : इ-चलनचा दंड भरायला न्यायालयात गर्दी

सासवड (ता. पुरंदर) हे शहर तर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे येथे खासगी आणि संस्थात्मक, ट्रस्ट स्वरुपातील अनेक रुग्णालये असून देखील `महात्मा फुले जनआरोग्य योजने`च्या लाभापासून रुग्णांना दूर राहावे लागत असल्याची खंत रुग्णांनीच अनेकदा बोलून दाखविली. कारण शासनाने कोविड - 19 अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले, त्यामुळे मध्यंतरी कोरोना रुग्ण कमी झाले म्हणताना. आता कोरोना नियमांबाबत नागरीकांची ढिलाई वाढली. त्यातून सासवड शहरासह ग्रामीण भागात रोज 15 ते 25 रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. तिसरी लाट येणार का नाही, त्यापेक्षाही दुसरी लाटच गेली नाही., याचे हे संकेत आहेत.

कोरोनाच्या पहील्या व दुसऱया लाटेत शासकीय कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, खासगी व संस्थात्मक कोविड सेंटर आणि विविध रुग्णालये फुल्ल झाली होती. मात्र स्थानिक पातळीवर `महात्मा फुले जनआरोग्य योजने`च्या लाभाचा.. रुग्णांना योजनेशी न जोडले गेलेल्या रुग्णालयांमुळे उपयोग करुन घेता आला नाही. जिल्हाधिकारी, जिल्हा परीषद सीईओ, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या पहिल्या लाटेतील दौऱयाच्या व सासवडच्या बैठकीच्या वेळीही हा प्रश्न चर्चेत आला होता.

त्यावेळीही जि.प.च्या सीईओनी रुग्णांची गरज लक्षात घेऊन रुग्णालयांनी तातडीने `महात्मा फुले जनआरोग्य योजने`च्या लाभासाठी योजनेकरीता प्रस्ताव द्यावेत. विविध दाखले, कागदपत्रांसाठी मदत केली जाईल., असे स्पष्ट केले होते. तरीही एकही रुग्णालय पुढे आले नाही. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण तालुक्यात खासगी व ट्रस्ट रुग्णालयांमध्ये ही योजनाच अद्याप लागू नाही. तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी या संदर्भाने सांगितले., सासवडचे एकच रुग्णालय या योजनेत पूर्वी होते, आता मात्र ते नाही. अधिक माहिती आरोग्य विभाग देऊ शकेल. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांच्याशी संपर्क केला, तो होऊ शकला नाही.

जनआरोग्य योजनेसाठीचे प्रस्ताव द्या, मदत करु- आमदार जगताप

पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप म्हणाले., निरोगी आरोग्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वोच्च प्राथमिकता आहे. रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, नैराश्य यासारख्या समस्या व त्यातून उद्भवणाऱया ह्दयविकार, मुत्रपिंड विकार, मेंदुविकार असे प्राणघातक आजार आक्रमण करीत आहेत. कोरोना महामारी अनुभवावी लागली. त्यामुळे माझे पुरंदर तालुक्यातील खासगी व ट्रस्ट स्वरुपातील रुग्णालयांना पुन्हा आवाहन राहील की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत तुमच्या रुग्णालयाचा समावेश करण्यासाठीचे अधिकाधिक प्रस्ताव द्या. माझ्या पातळीवरुन सर्वोतोपरी मदत केली जाईल.

``पूर्वी धन्वंतरी रुग्णालय जनआरोग्य योजनेत होते. काही कारणास्तव मध्यंतरी योजनेतून बाहेर आले. परंतु, आता तीन महिन्यांपूर्वीच परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा शासनाकडे दिला आहे. त्याची प्रतिक्षा करीत आहोत.``- डॉ. अमोल हेंद्रे, संचालक, धन्वंतरी रुग्णालय, सासवड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com