वाहतूक पोलिसांना झळा, साधी बूथचीही सोय नाही

संदीप जगदाळे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

हडपसर - दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. चौकांमध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस उभे असतात. भर उन्हात उभे राहूनच पोलिसांना काम करावे लागते. उभे राहण्यासाठी साधी बूथचीही सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. आरोग्यावर विपरीत परणीम होत आहे. 

डोक्यावर उन पायाखाली तापलेला रस्ता आणि उन्हाच्या झळा लागत असताना वाहतूक पोलिसांना काम करावे लागत आहे. अधिकारी एसी गाडीत फिरतात, मात्र उन्हात कर्तव्य बजावणा-या पोलिसांच्या आरोग्याकडे त्यांचे लक्ष नाही. चौकांमध्ये महिला पोलिसही भर उन्हातच वाहतुकीचे नियमन करताना दिसतात. यामुळे बहुतेक पोलिसांना थकवा जाणवणे, भूक न लागणे, चक्कर येणे असे त्रास होतात. अनेक पोलिसांना वाढत्या उन्हाच्या त्रासामुळे नेत्ररोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. डोळे लाल होणे, सतत पाणी येणे, डोळ्यांची आग होणे असा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.

Web Title: There is no facility of simple booth too for traffic police