पालखी महामार्गाला विरोध नाही पण...

राजकुमार थोरात 
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

वालचंदनगर  : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र प्रशासनाने भूसंपादनाच्या जागेचा व नुकसान भरपाईचा दर तरी किमान जाहीर करण्याची गरज असल्याचे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातुन संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग भवानीनगर ते सराटी दरम्यान होणार आहे. या प्रस्तावित महामार्गाची मोजणी पूर्ण झाली असून हद्दीही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या हद्दीमध्ये येणाऱ्या इमारती, विहिरी, पाइपलाईनचे व झाडांचे पंचानामे करण्याचे काम सुरु आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी लासुर्णेमधील नागरिकांनी पंचनामे करण्यास विरोध दर्शवून भूसंपादनाचा दर जाहीर करण्याची मागणी करुन शनिवारी (ता.18) काम थांबवले होते. मात्र आज सोमवार(ता. २०) रोजी जंक्शन व अंथुर्णे परीसरामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी पंचानामे करण्यासाठी आले असताना शेतकरी व स्थानिक नागरिकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेवून पालखी महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र भूसंपादन व नुकसान होणाऱ्या झाडे, इमारतीचे दर जाहीर करावे अशी आमची मागणी केली. दर जाहीर झाल्याशिवाय पंचानामे व पुढील कामे करुन देणार नसल्याची भूमिका घेतली. यावेळी भरणेवाडीचे उपसरपंच गुलाब म्हस्के, लासुर्णेचे ग्रामपंचायत सदस्य नेताजी लोंढे, अंथुर्णेचे माजी सरपंच विशाल साबळे, निलेश धापटे, देवराज धातोंडे, श्रीमंत बरळ, लक्ष्मण वाघ उपस्थित होते. 

Web Title: There is no oppose to Palkhi marg