#WeCareForPune पुण्यासाठी रेल्वेची योजना नाही !

There is no planning for pune railway
There is no planning for pune railway

पुणे : पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी पुणे विभागाला दोन वर्षांपूर्वी 2 हजार 25 कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत प्रकल्पाचे सर्वेक्षण आणि कामाला सुरवात करण्यासाठी ही तरतूद केली आहे. याशिवाय, पुणे-मिरज-लोंढा रेल्वे लाइनच्या कामासाठी 14.99 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच दौंड-मनमाड मार्गाला जोडण्यासाठी निर्माण करण्यात येत असलेल्या पुणे-दौंड कॉर्ड लाइनसाठी आठ कोटींची तरतूद केलेली आहे. या कॉर्ड लाइनमुळे मनमाडकडे जाणाऱ्या गाड्यांना दौंड जंक्‍शनला जाण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा दौंड स्थानकावरील अर्धातास वाचणार आहे. 

हडपसर सॅटेलाइट टर्मिनलच्या बांधकामासाठी दहा लाखांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या कामासाठी 2 कोटींची तरतूद केली आहे. पुणे-दौंड सिग्नल यंत्रणेसाठी एक कोटी 19 लाख, तर पुणे-लोणावळा दरम्यानच्या तीन व चार नंबरच्या रेल्वे लाइनसाठी 1 कोटींची तरतूद केली आहे. 
 

मध्य रेल्वेला यंदा सात हजार 672 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 15 टक्‍के अधिक आहे. पायाभूत सुविधा, नियोजित कामे आणि नवीन रेल्वे लाइनसाठी निधी मिळाला आहे. 
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 


पायाभूत सुविधांसाठी तरतूद -

  • बारामती-लोणंद मार्गासाठी 1 कोटी 
  • कराड-चिपळूण मार्गासाठी 10 लाख 
  • फलटण-पंढरपूर मार्गासाठी 10 लाख 
  • पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी 14 कोटी 99 लाख 
  • दौंड-मनमाड मार्गासाठी 20 कोटी 
  • पुणे-दौंड मार्गावरील अद्ययावत सिग्नल यंत्रणेसाठी 1 कोटी 19 हजार रुपये 
  • पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी 2 कोटी 
  • पुणे-दौंड लाइनला दौंड-मनमाड लाइनशी जोडण्यासाठी 8 कोटींचा निधी 
  • पुणे-दौंड मार्गावर (डाउन लाइन) सहा किमी मार्गाच्या नूतनीकरणासाठी 1.5 कोटी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com