भूगर्भातील पाण्यावर आपला हक्कच नाही - डॉ. उपेंद्र धोंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे - भूगर्भात साडेतीनशे फुटांखालचे पाणी हे आपल्या हक्काचे नाही. ते निसर्गाचे आहे, ते पाणी उपसले, तर भूकंपासारख्या हानीकारक घटना घडू शकतील. त्यासाठी आपण कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. स्थानिक पातळीवरील अद्ययावत भूजल निरीक्षणे नोंदविण्याची व्यवस्था व मनुष्यबळ शासनाकडे नसल्याचे मत भूजलतज्ज्ञ डॉ. उपेंद्र धोंडे यांनी व्यक्त केले.

समग्र नदी परिवारच्या वतीने ‘भूजलाशी मैत्री’ या विषयावर एरंडवणे येथील मनोहर मंगल कार्यालय येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत डॉ. धोंडे बोलत होते. या वेळी डॉ. प्रदीप पुरंदरे, डॉ. उमेश मुंडल्ये, सतीश देशमुख, जगदीश गांधी, मिलिंद बागल, राजेंद्र शेलार, मयूर बागूल, प्रशांत शिनगारे, प्रतिभा शिंदे, कल्पना साळुंके आदी उपस्थित होते. 

डॉ. धोंडे म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये पावसाचा दुष्काळ नाही. पाणीवाटपाच्या धोरणाचा दुष्काळ आहे. मात्र, या सगळ्याचा त्रास सामान्यांना होत असतो. आपल्या गाव शिवारातील भूगर्भात नेमके पाणी किती आहे, याची कल्पनाच आपल्याला नाही. उपसा किती होतो, याची भूजल विभागाकडे असलेली आकडेवारी ढोबळ आहे. दर वर्षी उन्हाळ्यात शासनाकडून दुष्काळ घोषित केला जातो. परंतु, शासनाकडून दुष्काळ कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. सुनील जोशी यांनी प्रास्ताविक केले.  मयूर बागल यांनी आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no right to water on groundwater