पिंपरी महापालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष करवाढ नाही; कर वसुलीवर भर

122pcmc_65.jpg
122pcmc_65.jpg

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षाचा ६ हजार १८३ कोटी १३ लाख रूपयांचा केंद्राच्या योजनेंसह अर्थसंकल्प स्थायी समिती सभेपुढे सादर करण्यात आला. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा अर्थसंकल्प स्थायी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे सादर केला. या अंदाजपत्रकात कोणतीही विशेष कर वाढ करण्यात आली नसून कर वसुली करण्यावर भर देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेचे हे ३७ वे अंदाजपत्रक आहे. तत्पुर्वी सभेच्या सुरूवातीला काश्मिर हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहून सभा १० मिनिटे तहकूब करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड 2019-20 अंदाजपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमध्ये सादर केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे 4 हजार 620 कोटींचे अंदाजपत्रक आयुक्तांनी सादर केले  

  • मनपाच्या विकास कामांसाठी 1363.74 कोटी रुपयांची भरीव तरतूद 
  • ​क्षेत्रीय स्तरावरील विकास कामासाठी कोट्यावधी रुवयांची तरतूद 
  • विशेष योजनांअंतर्गत आणि नाविन्यपूर्ण योजना या लेखाशीर्षावर 1124.72 कोटींची तरतूद 
  • शहरी गरिबांसाठी BSUP अंदाजपत्रकात 992.64 कोटींची 

तरतूद  

  • जेंडर बजेट - महिलांच्या विविध योजनांसाठी 40.95 कोटींची भरीव तरतूद 
  • महापौर विकास निधीसाठी 5 कोटींची तरतूद 
  • अपंग कल्याणकारी योजनांसाठी 31.14 कोटींची तरतूद 
  • पाणी पुरवठा विषेशनिधी 87.50 कोटी
  • पीएमपीएलकरिता अंदाजपत्रकात 190.82 कोटींची तरतूद 
  • नगर रचना भू संपादनकरिता 140 कोटींची तरतूद 
  • अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थे करीता 2.30 कोटी
  • स्वच्छ भारत मिशनसाठी 10.38 कोटी 
  • स्मार्ट सिटी साठी 150 कोटींची तरतूद 
  • मा.प्रधानमंत्री आवास योजना साठी 36.39 कोटी
  • अमृत योजनेसाठी 72.50 कोटी
  • नदी सुधार प्रकल्प 200 कोटी 
  • वाय.सी.एम. एच पी जी इन्स्टिट्यूट उर्वरित विभाग कार्यन्वित करणे
  • मेट्रो प्रकल्पाकरिता 5 कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com