शिरूर तालुक्यात पट्टेरी वाघ नसून तरस आहे  

Leopard_
Leopard_

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्‍यातील बिबटची संख्या वाढली आहे. या भागात वाघ किंवा पट्टेरी वाघ निश्‍चित नाही. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये, वनविभागाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन माणिकडोह (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.  अजय देशमुख यांनी केले आहे.  परिसरात पट्टेरी वाघ नसून पूर्ण वयाचे तरस या परिसरात असल्याचे काही नागरिकांच्या चर्चेतून ऐकावयास मिळत आहे. 

जांबूत, पिंपरखेड, वडनेर, टाकळी हाजी या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे.  नदीकाठचा भाग व उसाची शेती यामुळे बिबट्यांना आडोसा मिळू लागला आहे. त्याबरोबर सहजतेने उपलब्ध होणारे भक्ष्य व मेंढपाळ व्यावसायिकांची अधिक गर्दी यामुळे या भागात बिबटचे वास्तव दिसून येते. जांबूत (ता. शिरूर) जोरीलवन या परिसरात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे अनेक नागरिकांनी वारंवार सांगितले. सोशल मीडियावर चंद्रपूर भागातील वाघाचा व्हिडिओ टाकून या भागात वाघ असल्याचे दाखविले जात आहे. मात्र हा व्हिडिओ फेक असून, या परिसरात पट्टेरी वाघ अथवा कोणताही वाघ नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. या उलट बिबट्यांची संख्या वाढली आहे. त्याला निर्सगामधील बदलाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतात काम करत असताना मोबाईलवर गाणे वाचवा, हातात काठी घेऊन शेतावर जा, अंगणात मुलांना एकटे सोडू नका, खाली वाकून काम करत असताना सावधानता बाळगा, वेळोवेळी वनविभाग या परिसरात प्रबोधन करीत आहे. त्यामुळे या परिसरात वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. 
 
जोरीलवन येथे दोन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना घडल्यानंतर या भागात बिबट्यांची संख्या अधिक असल्याचे निर्दशनास आले आहे. पट्टेरी वाघ असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र हा पट्टेरी वाघ नसून पूर्ण वयाचे तरस या परिसरात असल्याचे काही नागरिकांच्या चर्चेतून ऐकावयास मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com