पाणीकपात तूर्तास नाही : गिरीश बापट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

पुणे : ''पुणेकरांना पुरेसे पाणी देण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आणखी महिनाभर तरी पाणीकपात नसेल. पाणीकपात करण्याआधी चर्चा केली जाईल.'', असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सध्या ज्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो आहे, तो तसाच ठेवण्याची सूचनाही बापट यांनी महापालिकेतील पदाधिकारी-अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे तूर्तास पाणीकपात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सुनावणी, जादा पाण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आणि त्यावरील कार्यवाहीच्या पार्श्‍वभूमीवर बापट यांच्यासमवेत महापालिका, पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. 

पाणीसाठ्यात कपात करण्याच्या प्राधिकरणाच्या निर्णयानंतर पाणीकपातीची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सुमारे 55 लाख लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा पुरविण्याची मागणी महापालिकेकडून राज्य सरकार आणि प्राधिकरणाकडे करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. तेव्हा, पाणीकपातीचा निर्णय पालकमंत्री घेतील, असे राव यांनी गुरुवारी म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी बैठकीत चर्चा करून आपली भूमिका मांडली. 

ते म्हणाले, "शहरात सध्या तरी पाणीकपात करण्याची आवश्‍यकता नाही. तसे नियोजनही करण्यात आलेले नाही. त्यामुळे जेवढे पाणी सध्या दिले जात आहे, तेवढे पाणी मिळेल. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येतील. सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे.'' दरम्यान, सध्या महापालिकेला पुरेसे पाणी द्यावे, अशी सूचनाही बापट यांनी पाटबंधारे खात्याला केली. परंतु, पाणीकपात करावी लागणार असल्याचा या खात्याच्या अधिकाऱ्यांचा सूर आहे. 

Web Title: there is no Water shortage for now : Bapat