esakal | दौंड : कोरोना झाला म्हणून काही घाबरायचं काम नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Digambar-Shinde

कोरोना झाला म्हणून काही घाबरायचं काम नाही. डॅाक्टर जे सांगतात ते ऐकलं आणि नियम पाळले तर कोरोनातून नीट होता येतं, अस मत कोरोनाच्या आजारपणातून बरे झालेले दौंड शहरातील रेशन दुकानदार दिगंबर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

दौंड : कोरोना झाला म्हणून काही घाबरायचं काम नाही

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) - कोरोना झाला म्हणून काही घाबरायचं काम नाही. डॅाक्टर जे सांगतात ते ऐकलं आणि नियम पाळले तर कोरोनातून नीट होता येतं, अस मत कोरोनाच्या आजारपणातून बरे झालेले दौंड शहरातील रेशन दुकानदार दिगंबर शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड शहरातील ५५ वर्षीय रेशन दुकानदार दिगंबर भानुदास शिंदे हे मधुमेहाचे रूग्ण. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने उप जिल्हा रूग्णालयात तपासणी केली असता त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले. शहरातील कोविड केअर सेंटर मध्ये त्यांना दहा दिवस उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 

पुणेकरांनो, कोरोनाबाबत आली गुड न्यूज; गेल्या ६ दिवसांची आकडेवारी काय सांगते पाहा

दिगंबर शिंदे यांना कोविड केअर सेंटर मधील उपचारांविषयी विचारले असता ते म्हणाले, `` सुरवातीला भीती वाटली. पण दाखल झाल्यानंतर ठरलेल्या वेळेवर सर्व तपासण्या केल्या जात होत्या. डॅा. मिलिंद कांबळे हे प्रत्येकाच्या अडचणी समजून घेत समुपदेशन करत होते.

डॅाक्टरांबरोबर नर्स आणि स्टाफ आमची काळजी घेत होते त्यामुळे भीती निघून गेली. वेळीच उपचार झाले तर या आजारावर नियंत्रण मिळवता येतं. कोरोनाला भिण्याचं काही कारण नाही. डॅाक्टरांनी सांगितलेली पथ्य, आहार आणि मास्कचा वापर केला तर पुढेही अडचण येणार नाही.`

पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

दहा दिवसांच्या उपचारानंतर जय भवानी मंडळाचे खजिनदार असलेले दिगंबर शिंदे घरी परतल्यानंतर त्यांचे गल्लीत छोटेखानी स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण केले तर माजी नगरसेवक राजाभाऊ निंबाळकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे सल्लागार रमेश वैद्य यांच्यासह गणेश शहाणे, दीपक विघ्ने, मंगेश वैद्य, राहुल गवळी, संतोष वाघ, विनायक निंबाळकर, निखिल, सागर गवळी, अक्षय काटे, ऋषीकेश सुतार, संतोष लोणकर, आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

loading image