पुणेकरांनो, छत्री, रेनकोट जवळ असू द्या, आजही हलक्‍या पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर पाणी साठले होते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी 33.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जानेवारी महिन्यात आजपर्यंत 36.8 मिमी पावसाची नोंद झाल्याचे खात्याने कळविले आहे.

पुणे : दोन दिवसांच्या जोरदार सरीनंतर शनिवार शहरात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. पुढील दोन दिवस शहर व परिसरात आकाश ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. तसेच, रविवारी (ता. 10) दुपारनंतर हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यावर पाणी साठले होते. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता नोंदविलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सरासरी 33.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जानेवारी महिन्यात आजपर्यंत 36.8 मिमी पावसाची नोंद झाल्याचे खात्याने कळविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारनंतर राज्यात हवामान कोरडे असेल. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून शनिवारी शहरातील किमान तापमान 19.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या अरबी समुद्रात दक्षिणेकडील भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडला.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is a possibility of light rain even today in pune