मनात कायम सामाजिक बांधिलकी असावी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

खडकवासला : "आपल्याला आवड आणि रुचि असलेले क्षेत्रच करिअर म्हणून निवडावे. त्याचा फायदा हा भविष्यातील प्रगती साधताना तुम्हाला मानसिक समाधान ही प्राप्त होईल. तसेच, शिक्षण आणि दैनंदिन प्रगतीत समाजाचा वाटा असतो. त्या समाजाचे ऋण आहेत ही सामाजिक बांधिलकी देखील आपल्या मनात कायम असली पाहिजे." असा सल्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार भीमराव तापकीर  यांनी दिला. 

खडकवासला : "आपल्याला आवड आणि रुचि असलेले क्षेत्रच करिअर म्हणून निवडावे. त्याचा फायदा हा भविष्यातील प्रगती साधताना तुम्हाला मानसिक समाधान ही प्राप्त होईल. तसेच, शिक्षण आणि दैनंदिन प्रगतीत समाजाचा वाटा असतो. त्या समाजाचे ऋण आहेत ही सामाजिक बांधिलकी देखील आपल्या मनात कायम असली पाहिजे." असा सल्ला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आमदार भीमराव तापकीर  यांनी दिला. 

सिंहगड रस्त्यावरील वडगांव बुद्रुक येथील केदारनाथ सार्वजानिक वाचनालय आणि सामाजिक संस्था तसेच केदारनाथ पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १०वी आणि १२वीच्या पारिक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात पुणे शहर आणि ग्रामीण भागातील पालकांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच खडकवासला विधानसभा क्षेत्रातील वारकरी दिंड्यांना पखवाज हे वाद्य देऊन गौरवन्यात आले. खडकवासला विधानसभेचे आमदार भिमराव तापकीर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाधवर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर उपस्थित होते. 

कार्यक्रमास नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक श्रीकांत जगताप, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, अनंत दांगट, गंगाधर भडावळे, अभिजित देशमुख, आनंद डफळ, नांदेडकर मंडळींची दिंडीचे ह.भ.प.रामदास चरवड, शंकर चोरघे महाराज, गोऱ्हेकर वारकरी दिंडीचे ह.भ.प.वाघ महाराज, पालवबाबा वारकरी दिंडीचे ह.भ.प.विजू बराटे, तसेच शिवगंगा खोरे वारकरी दिंडी खेडशिवापुरचे प्रतिनिधी तसेच सुनिल चरवड, धनंजय पोकळे, चंद्रकांत पवळे, केदार जाधव, श्रीकांत काटकर, श्रीकांत पवळे, विकास कांबळे, आकाश लोणारे, गिरीश जोशी, आदि मान्यवर उपस्थित होते.

‘माणसाला मानुस बनवणार्‍या शिक्षणाची आज गरज असून शिक्षणाला अध्यात्माशी जोडने ही आज काळाची गरज बनली आहे. आजची पीढी मिळालेल्या ज्ञांनाचा वापर गैरमार्गासाठी करत आहे. संस्कारक्षम पीढी घडविण्याची शिक्षक आणि पालकांची संयुक्त जबाबदारी असून सदर प्रकारचे कार्यक्रम त्यात मोलाचे योगदान देत आहे. ब्रिटिशांनी गुलामगिरीच्या उद्देशाने निर्माण केलेली शिक्षण पद्धती बदलावी लागेल. असे जाधवर यांनी सांगितले. 

पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त तुषार दौंडकर यांनीही यावेळेस बोलताना विद्यार्थ्यांना आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सोहम लाईफ कन्सल्टन्सी प्रस्तुत करिअर विषयी बोलू काही हा कार्यक्रम सादर करण्यात आला. करिअर मार्गदर्शिका मीनल सोनवणे यांनी तो सादर करून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध पर्यायांबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: There should always be a social commitment in mind