मराठी भाषेत वाङ्‌मयाचे वेगवेगळे प्रयोग व्हावेत - बाबासाहेब पुरंदरे

वारजे - ‘अमात्य हेग्रीस मलयकेशिराज’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) शरद जतकर, बाबा धुमाळ, बाबासाहेब पुरंदरे, न. म. जोशी, दीपाली धुमाळ, शैलजा जतकर, डी. के. जोशी.
वारजे - ‘अमात्य हेग्रीस मलयकेशिराज’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) शरद जतकर, बाबा धुमाळ, बाबासाहेब पुरंदरे, न. म. जोशी, दीपाली धुमाळ, शैलजा जतकर, डी. के. जोशी.

वारजे - कांदबरी ही समजावून घेणे गरजेचे आहे. अशा कांदबऱ्या निर्माण झाल्याने मराठी भाषेला एक अलंकार निर्माण होईल, असे मत महाराष्ट्रभूषण व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वारजे येथे व्यक्त केले.  

पुणे महापालिका मराठी भाषा संवर्धन समिती, साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शरद जतकर यांच्या ‘अमात्य हेग्रीस मलयकेशिराज’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा पुरंदरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक न. म. जोशी होते. ज्येष्ठ साहित्यिक माधवी वैद्य, नगरसेविका दीपाली धुमाळ, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, शैलेजा जतकर, सचिव डी. के. जोशी, उदय कुलकर्णी, गोपाल कुलकर्णी, जयंत मोहिते, सई जतकर, सुरेश जाधव या वेळी उपस्थित होते. 

पुरंदरे म्हणाले, ‘दिलेला शब्द आणि ठरलेली वेळ नेहमी पाळलेली पाहिजे.

कादंबरी वाचाच. ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषेत वाङ्‌मयाचे वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होईल. ही कादंबरी गूढच आहे. मराठी शैलीतील चांगले पाऊल आहे. ७० वर्षे झाली व्याख्यान देतोय. त्यामध्ये ८ हजार व्याख्याने दिली आहेत; पण कधीही वेळ चुकू दिली नाही. शहाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांना साहित्याची चांगली जाण होती.’ 

जोशी म्हणाले, ‘बाबासाहेब आणि जतकर यांची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. इतरांपर्यंतही ही पुस्तके जावीत. वाङ्‌मयीन अपत्याला बंधन नसते. आपले हे पहिलेच पुस्तक असल्याने इतर पुस्तकांचे लिखाण व्हावे.’ प्रणव जतकर यांनी सूत्रसंचालन केले. बाबा धुमाळ यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com