जिल्ह्यातील १४ नगरपालिकांत १६७ नगरसेविका होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chair

जिल्ह्यातील १४ नगरपालिकांत १६७ नगरसेविका होणार

पुणे - पुणे जिल्ह्यातील बारा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण सोमवारी (ता.१३) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीत या सर्व पालिकांच्या मिळून नगरसेवकांच्या एकूण ३२९ पैकी १६७ जागा या विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व पालिका आणि नगर पंचायतीचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले आहे.

दरम्यान, नगरपालिकांच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अ वर्ग नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या तीनने तर ब वर्ग नगरपालिकांतील नगरसेवकांची संख्या प्रत्येकी दोनने वाढली आहे. नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १७ जागा आहेत. यामुळे बारा नगरपालिकांसाठी मिळून एकूण २९५ तर, दोन नगर पंचायतींसाठी मिळून एकूण ३४ नगरसेवक आहेत. नगरपालिकांच्या २९५ जागांपैकी १५० जागा महिलांसाठी तर, दोन नगर परिषदांच्या एकूण ३४ जागांपैकी १७ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

जिल्ह्यातील १२ पैकी बारामती ही एकमेव नगरपालिका अ वर्गात आहे. येथील जागांची संख्या तीनने वाढून, ती आता ४१ झाली आहे. अन्य ११ नगरपालिकांतील जागांमध्ये पूर्वीच्या तुलनेत प्रत्येकी दोनने वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी एकूण जागा १८ असलेल्या नगरपालिकांतील नगरसेविकांची संख्या २०, पूर्वी २० जागा असलेल्यांची संख्या आता २२, १९ जागा असलेल्यांची संख्या २१, २३ जागा असलेल्यांची संख्या २५, २४ जागा असलेल्यांची संख्या २६ आणि २६ जागा असलेल्यांची संख्या २८ झाली आहे.

नगरपालिकांनिहाय महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागा पुढीलप्रमाणे (कंसात एकूण जागा) ः शिरूर - १२ (२४), दौंड - १३ (२६), आळंदी - ११ (२१), राजगुरुनगर - ११ (२१), सासवड - ११ (२२), जेजुरी -१० (२०), जुन्नर-१० (२०), इंदापूर -१० (२०), बारामती - २१ (४१), लोणावळा - १४ (२७) तळेगाव दाभाडे - १४ (२८) आणि चाकण - १३ (२५). मंचर नगर पंचायतीतील १७ पैकी आठ तर, माळेगाव नगर पंचायतीतील १७ पैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.

Web Title: There Will Be 167 Corporators In 14 Municipalities Of Pune District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top