दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी असणार 'स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली'

मीनाक्षी गुरव
Tuesday, 20 October 2020

नोव्हेंबर-डिसेंबर २०२०मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षेसंदर्भातील 'स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली' लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नोव्हेंबर-डिसेंबर २०२०मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता या परीक्षेसंदर्भातील 'स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली' लवकरच जाहीर केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थी- पालक यांची होणारी गर्दी, त्यांना असणारा परीक्षेचा ताण हे डोळ्यासमोर येते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा असली तरी कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेला जाण्याची धास्ती असणारच आहे. मात्र विद्यार्थी-पालकांची कोरोनाचा संसर्ग वाढण्याची चिंता लक्षात घेता परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेतली जाणार आहे.

परीक्षा केंद्रावरील कर्मचारी, शिक्षक, पर्यावेक्षक अशा संबंधित अधिकारी यांनी काय दक्षता घ्यावी, विद्यार्थी-पालकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत स्वतंत्र मार्गदर्शक कार्यप्रणाली तयार केली जाणार आहे. राज्य मंडळातर्फे आरोग्य विभागाच्या सूचनांवरून ही कार्यप्रणाली तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत ती जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळातील विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदा दहावी-बारावीच्या निकालात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. तर अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. तसेच दरवर्षी राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असते. दरवर्षी या परीक्षेसाठीची केंद्रेही ऑक्टोबरमध्येच निश्चित झालेली असतात. त्यात पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहुन केंद्रांच्या संख्येत बदल केला जातो. आता परीक्षेदरम्यान या केंद्रांवर काय काळजी घ्यावी, हे लवकरच राज्य मंडळातर्फे जाहीर केले जाणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

साधारणतः अशी असेल मार्गदर्शक कार्यप्रणाली :
- परीक्षा केंद्रावर गर्दी करू नये
- परिक्षा केंद्रावरील वर्गांचे निर्जतुकीकरण करणे
- केंद्रावर सँनिटायझरची सुविधा
- ताप मापन यंत्रणा
- विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था कशी असावी, हे ठरविले जाईल

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य मंडळाने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचे अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. असे असताना मंडळाने लवकरात लवकर मार्गदर्शक कार्यप्रणाली जाहीर करावी, जेणेकरून शाळांसह विद्यार्थी-पालकांना सोयीचे होणार आहे."
-एक मुख्याध्यापक (नाव न घेण्याच्या अटीवरुन)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a separate guideline for the 10th-12th supplementary examination