प्लास्टिकबरोबरच थर्माकॉलच्या वस्तूही बाजारातून हद्दपार

मिलिंद संगई
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : प्लॅस्टिकबंदीच्या शासनाच्या निर्णयानंतर आता हळुहळू बाजारातील प्लॅस्टिक कॅरिबॅग हद्दपार होऊ लागल्या आहेत. इतकेच नाही तर थर्माकोलच्या वस्तूही आता विक्रेत्यांना मिळत नसल्याने आपोआपच या वस्तूंची जागा पुर्नवापर करता येईल अशा वस्तूंनी घेतली आहे. 

शासनाने प्लॅस्टिक कॅरिबॅगवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुकानदारांनीही ग्राहकांना स्वताःच्या कापडी किंवा कागदी पिशव्या आणण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कॅरिबॅगचा वापर होऊ नये या साठी दुकानदारांच्या पातळीवरच काळजी घेतली जात आहे. 
दरम्यान लग्नासह इतर कार्यात लागणा-या थर्माकोलच्या प्लेट, वाट्या गायब झाल्या असून आता पुन्हा पत्रावळी व कागदी डिशला मागणी वाढली आहे. बारामतीतील जवळपास सर्वच दुकानदारांनी या वस्तूंची विक्रीच थांबवल्याने ग्राहकांनाही आता पत्रावळी किंवा कागदी डिशकडे वळण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. 

ग्राहकांनी खरेदीला येताना स्वताःची पिशवी आणली तर त्यांची गैरसोय होणार नाही, त्या मुळे प्लॅस्टिक बंदीबाबत ग्राहकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे दुकानदारांनी नमूद केले. 

Web Title: thermacol is also also boycott with plastic from market

टॅग्स