पुण्यात 9 कंपन्याच्या केबल ओव्हरहेड; महापालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला

उमेश शेळके
रविवार, 12 जुलै 2020

इंटरनेट कंपन्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर झाडावरून, विद्युत खांबावरून टाकल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. याशिवाय शहराचे सुद्धा विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे या केबल काढून टाकून भूमिगत करण्याचे बंधन कंपन्यांना घालावे, असा प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडला आहे. 

 

पुणे : पुणे शहरात सुमारे नऊ पेक्षा अधिक केबल कंपन्यांची मिळून सुमारे चार ते साडेचार हजार किलोमीटर केबल ही ओव्हरहेड पद्धतीने टाकली आहे. त्या भूमिगत टाकण्याचे कंपन्यांना बंधनकारक केले, तर महापालिकेच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन यावर काय करवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

लॉकडाउनमुळे सामान्यांचे किचन बजेट कोलमडणार; भाज्यांसह फळांच्या दरात...

इंटरनेट कंपन्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर झाडावरून, विद्युत खांबावरून टाकल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. याशिवाय शहराचे सुद्धा विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे या केबल काढून टाकून भूमिगत करण्याचे बंधन कंपन्यांना घालावे, असा प्रस्ताव स्थायी समिती समोर मांडला आहे. 

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

पुणे शहरात हाथवे केबल, जीटीपीएल, नेक्‍स्ट जनरेशन, आयसीसी, एससीसी, सिटी केबल, जॉयस्टर, डिवाईज, फायुनेट, मायक्रोस्कॅन आणि फायफाय अशा सुमारे नऊ केबल कंपन्या आहेत. याशिवाय अन्य काही कंपन्या आहेत. सर्व कंपन्यांची मिळून सुमारे चार ते साडेचार हजार किलोमीटर लांबीच्या केबल या ओव्हरहेड आहेत. महापालिकेने या कंपन्यांना भूमिगत केबल टाकण्याचे बंधन घातले. तर त्यातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो. तसेच शहराचे विद्रुपीकरण देखील त्यातून थांबणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

''ओव्हरहेड केबलमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच महापालिकेचे उत्पन्न देखील बुडत आहे. त्यामुळे केबल कंपन्यांना भूमिगत केबल टाकण्याचे बंधनकारक करण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला आहे. पुढील आठवड्यात त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल.''
- हेमंत रासने (अध्यक्ष स्थायी समिती)

Edited by : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: these 9 companies Cables Are overhead in Pune