जुन्नरकरांनो सावधान, या 44 पथकांची तुमच्यावर आहे नजर 

lock down
lock down

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील १५१ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३० जणांचा  निगेटिव्ह, तर ११  जणांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला असून, आजअखेर (ता. २७) दहा जणांचे अहवाल येणे बाकी आहेत, अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर व निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी दिली.

डिंगोरे येथील रुग्ण बरा झाला असून, सध्या सावरगाव  येथे ५, धोलवड येथे ३ व खिलारवाडी व मांजरवाडी येथे प्रत्येकी एक, असे दहा पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जांभुळपट- धोलवड, सावरगाव, खिलारवाडी व मांजरवाडी ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून, येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील नागरिकांना फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, ४४ देखरेख पथके या गावांवर लक्ष ठेऊन आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संशयित रुग्णांची लेण्याद्री येथील कोविड केंद्रात हाय रिस्क व लो रिस्क अशी वर्गवारी करण्यात येत आहे. येथे रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येत असल्याने आता रुग्णांना स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे जाण्याची गरज राहिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com