वन्य प्राण्यांची तहान भागवून केली ईद साजरी

चिंतामणी क्षीरसागर
शनिवार, 16 जून 2018

वडगाव निंबाळकर : वन विभागाच्या हद्दीतील पाण्याच्या रिकाम्या टाक्या, पाईपलाईन मधुन गळती होत असलेली हमखास पाणी उपलब्धतेची जागा गेल्या पंधरा दिवसांपासुन कोरडी पडल्याने पाण्यावाचुन प्राण्यांचे हाल चालले होते. मुढाळे (ता. बारामती) येथील शाहीद खुदबुद्दीन मुजावर व जमिर कासमभाई मुजावर या दोन मुस्लीम तरूणांनी त्या पाणवठ्यात पाणी भरून आज ईद साजरी केली.

मुढाळे गावालगत असलेल्या वनविभागाच्या हद्दीत प्रामुख्याने चिंकारा जातीच्या हरणांसह विविध प्रकारचे वन्य जिव मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याच्या व्यवस्थेसाठी वनविभागाने टाक्या बसवल्या आहेत. पण यामधील पाणी बकऱ्या व शेळी मेंढीच्या कळपाने फस्त केलेले असते. मुढाळे ढाकाळे मार्गालगत जळकेवाडी भागातील रहिवाशांसाठी गेलेली पाईपलाईन वनविभागाला लागुन असल्याने यावरील एका वॉलमधुन सतत पाणी येत असते. हेच ठिकाण वनविभागातील वन्य प्राण्यांसाठी हमखास पाणी मिळण्याचे आहे. पण गावातील रोहित्र जळाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासुन पाईप लाईनमधील पाणी बंद आहे.

परिणामी वन्य प्राण्यांना पाणी नाही. त्यांची पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील दोन मुस्लीम तरूणांनी आज ईद निमित्त प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली. जोपर्यंत पाऊस पडत नाही. किंवा पाईपलाईन सुरू होत नाही तोपर्यंत पाणवठा पाण्याने भरून ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायत कर्मचारी भरत थोरात व मुजावर बंधुनी गळती होत असलेल्या ठिकाणी पाणवठा तयार केला आहे. प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करून त्यांचे संरक्षण करण्याचा मी संकल्प केला असल्याचे जमिर मुजावर यांनी सांगीतले.

Web Title: they available water for the wild animal's thirst and celebrate Eid