त्यांनी चक्क देव चोरला

भांबोली (ता. खेड) : वर्षानुवर्षे पूजा केली जाणाऱ्या याच ठिकाणाहून मूर्तीची चोरी झाली आहे. हे ठिकाण दाखविताना ग्रामस्थ.
भांबोली (ता. खेड) : वर्षानुवर्षे पूजा केली जाणाऱ्या याच ठिकाणाहून मूर्तीची चोरी झाली आहे. हे ठिकाण दाखविताना ग्रामस्थ.

आंबेठाण (पुणे): चोरटे कशाची चोरी करतील याचा काही नेम नाही. अशीच एक अजब चोरी मुरूम चोरांनी भांबोली (ता. खेड) येथे केली आहे. ग्रामस्थांची श्रद्धा असणाऱ्या वेताळबुवा देवाची दगडाची मूर्तीच या मुरूम माफियांनी चोरली आहे. त्यामुळे भांबोली ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. 


संबंधित ठिकाणी मुरूम चोरणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. देवतांच्या मूर्तीची अशी चोरी व्हायला लागली, तर न्याय कोणाकडे मागावा, अशी विचारणा लोक करीत आहेत. भांबोली गावाच्या उत्तरेला असणाऱ्या तळ्याच्या एका किनाऱ्यालगत पूर्वीपासून गावकऱ्यांची श्रद्धा असणारे वेताळबुवा या दैवताचे ठाणे होते. नागरिक नित्यनियमाने त्याठिकाणी जाऊन पूजा अर्चा करीत असत.

काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केला जात आहे. लगत असणाऱ्या एमआयडीसी जागेतील मुरूमदेखील चोरीला जात आहे. ही मुरूम चोरी विविध कंपन्यांमध्ये भरावासाठी केली जात असून त्याद्वारे रात्रीत लाखो रुपये कमावले जात आहेत. भरावासाठी कुठलाही माल उचलला जात असल्याने काहींनी तर देवाच्या दगडाच्या मूर्तीची चोरीच त्यासाठी केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. रात्रभर येणारा गाड्यांच्या आणि मशिनच्या आवाजाने येथील नागरिक हैराण झाले आहेत. 


गावकऱ्यांची श्रद्धा असणाऱ्या देवतेची मूर्ती पुन्हा शोधावी आणि तिची याच पूर्वीच्या ठिकाणी स्थापना करावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत. या प्रसंगी सरपंच सागर निखाडे, उपसरपंच देविदास राऊत, भरत लांडगे, अतुल निखाडे, शरद वाडेकर, चिंधू राऊत, काळूराम गाडे, तुकाराम निखाडे, नंदू लांडगे, गोविंद राऊत, अंकुश राऊत, अर्जुन राऊत, दत्ता राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com