आम्हाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

पौड रस्ता : पौड रस्त्यावरील भीमनगर वस्तीमधील रहिवाशांना एसआरए योजनेअंतर्गत गोकुळनगर येथे घरे देण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु बिल्डरने फसवणूक केल्याचे सांगत येथील रहिवाशांनी गोकुळनगरमधील घरे स्वीकारण्यास नकार दिला आहे. या प्रक्रियेत सावळागोंधळ असून, ठोस कागदपत्रे असूनदेखील काही जणांना अपात्र ठरवले आहे; मात्र पूर्ण कागदपत्रे नसलेल्यांना पात्र ठरवले. भीमनगरमधील घर सोडून गोकुळनगरला जावे म्हणून दबाव टाकण्यात येत आहे, असे रहिवाशांनी सांगितले. 

संपूर्ण प्रकल्पाची फेरतपासणी व चौकशी करून येथील रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, महापौर, उपमहापौर, एसआरए, पोलिस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे रहिवाशांनी न्यायाची मागणी केली आहे.
भीमनगरमध्ये झालेल्या बैठकीत रवींद्र मळली, जयश्री शेडगे, मंगल घोगरे, केसरबाई कांबळे, मुद्रुका चव्हाण, कुसुम थोरात, शोभा पवळ, स्नेहल गायकवाड, वर्षा डेंगळे, येणूबाई दहिभाते, प्रकाश शिर्के, सावित्रा थोरात, कांता ओव्हाळ, द्रुपदा पोळ, हसीना शेख, अलका गायकवाड, रेश्‍मा पल्ला, रेश्‍मा शेख आदी रहिवासी उपस्थित होते. 

याबाबत नगरसेवक पृथ्वीराज सुतार म्हणाले, बाधित रहिवाशांचे एसआरए व बीएसयूपी योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामध्ये काही लोकांनी याच परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या निवासी सदनिकांपैकी काही जागा या लोकांना देता येतील का या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com