मैदानावर चिखलातुन गाडी नेणे पडतेय महागात

रमेश मोरे
सोमवार, 16 जुलै 2018

सांगवी - येथील पी.डब्ल्यु.डी.मैदानावर गाडी शिकण्यासाठी नेहमी गर्दी असते. तर जुनी सांगवी नवी सांगवीकडे या मोकळ्या मैदानातुन जाण्यासाठी शॉर्टकट म्हणुन अनेकजण येथुन गाड्या घेवुन जातात. आनेक चारचाकी वाहनेही येथे नागरीक लावतांना दिसतात. संततधार पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे. परंतु काही अती उत्साही तरूण चिखलातुन गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका अती उत्साही तरूणाला येथुन गाडी घेवुन जाण्याचा प्रयास नडला. मैदानावरील लाल चिखलात गाडी रूतल्याने या तरूणासोबतच ईतर नागरीकांची गाडी बाहेर काढण्यासाठी तारांबळ उडाली. अखेर ईतर नागरिकांच्या प्रयत्नामुळे गाडी बाहेर काढण्यात यश आले. 

अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडुन पावसाळा संपेपर्यंत वाहन चालकांना गाडी आत घेऊन जाण्यासाठी मज्जाव करावा. व तसा दिशा दर्शक फलक लावावा व वाहन चालकांनी पण स्वःताहून आतमध्ये वाहने घेऊन जाऊं नये आसे आव्हान मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे आण्णा जोगदंड यांनी केले आहे. 

Web Title: they were forced to take a car from the mud