Wari 2019 : पालखीत चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक  

3arrested_54.jpg
3arrested_54.jpg

पुणे : संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे चोरट्यांनी मोबाईल व सोनसाखळी चोरुन नेली. डेक्कन व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी दोन सख्ख्या भावांसह तिघांना अटक केली. 

मोबाईल चोरीप्रकरणी निलेश सोनवणे (वय 35,, रा. आझादनगर, कोथरुड) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आदेश लालजु चव्हाण (वय 20), अक्षय लालजु चव्हाण (वय 18), रोहीत शाम सोळंकी (वय 19, तिघेही रा. मोहनगर, क्रांती चौक, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे व साक्षीदार निर्विकार मोटे (वय 34, रा. मॉडेल कॉलनी) हे दोघेही बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील तुकाराम पादुका चौकामध्ये पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चव्हाण, सोळंकी यांनी गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांचा मोबाईल चोरला, त्यानंतर त्यांनी मोटे यांचा अकरा हजार रुपयांचा मोबाईल चोरला. हा प्रकार मोटे व फिर्यादींच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दरम्यान, पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या एका भाविकाच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोनसाखळी चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी रणजित पाटील (वय 32, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पाटील हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन नेली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com