पिंपरी : दिवसा वेटर अन् रात्री दुचाकींवर डल्ला  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

पिंपरी : दिवसा हॉटेलमध्ये वेटरचे काम करून रात्रीच्या वेळी दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला निगडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून तेरा महागड्या दुचाकी व दोन माबाईल असा एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

बुद्धदेव विष्णू विश्‍वास (वय 21, रा. दत्तवाडी, आकुर्डी, मूळ-पश्‍चिम बंगाल) असे या चोरट्याचे नाव आहे. चिंचवड येथील थरमॅक्‍स चौकात एक जण 12 नोव्हेंबरला (मंगळवार) दुचाकीवरुन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना ताब्यात घेत त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला.  

सखोल तपास केला असता त्याने निगडीसह परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून निगडी पोलिस ठाण्याकडील पाच, पिंपरी ठाण्याकडील तीन व डेक्कन, हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड ठाण्याकडील प्रत्येकी एक असे एकूण तेरा दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून तेरा दुचाकी व दोन मोबाईल असा दहा लाख 90 हजारांचा मुद्देमाल निगडी पोलिसांनी जप्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief Arrested for theft two wheeler who used to work as waiter in day at pimpri