मूर्ती चोरणाऱ्याला दोन तासांत अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे - लष्कर भागातील सेंटर स्ट्रीटवरील श्री दत्त समाज तरुण मंडळाच्या श्री सिद्धिविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंचधातूची मूर्ती लष्कर पोलिसांच्या दक्षतेमुळे दोन तासांत मंगळवारी परत मिळाली. मंदिरातून मंगळवारी दुपारी बारा ते दोनच्या सुमारास पाच किलो वजनाची पंच धातूची भरीव असलेली मूर्ती चोरीला गेली. दुपारी तीनच्या सुमारास मूर्ती चोरीला गेल्याचे समजल्यावर कार्यकर्त्यांनी लष्कर पोलिसांशी संपर्क साधला. 

मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्‍या आधारे गुन्हे शाखेची पथके बाजारपेठेत, रेल्वे स्थानक आदी भागात तपासासाठी रवाना झाली. पुणे रेल्वे स्थानकावर फुटेजमधील संशयास्पद व्यक्ती आढळली. लष्कर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील गाडे यांच्या पथकाने तपासणी केली असता, अमर बळीराम अवघडे (वय २१, रा. सातारा) याच्याकडे मूर्ती सापडली.

Web Title: thief arrested in two hour