पुणे : चोरीचे 203 गुन्हे करणा-या 19 वर्षीय म्होरक्‍यासह टोळी अटकेत

Hadapsar-Police
Hadapsar-Police

पुणे - अल्पवयीन असतानाच 86 गुन्हे दाखल असलेल्या चोरासह त्यांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अवघे 19 वय असलेल्या या चोरट्याने आत्तापर्यंत एकूण 203 चोरीचे गुन्हे केले असून त्यातील 117 गुन्हे उघडकीस आले आहे. त्यातील 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पैतरसिंग उर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय 19, रा. हडपसर), निशांत अनिल ननवरे (वय 22 रा. ताडीवाला रोड) आणि ऋषिकेश तानाजी आतकर (वय 20 रा. वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पैतरसिंग पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दुचाकीवरून सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायट्यांची रेकी करत होता. त्यानंतर दोघा साथीदारांच्या मदतीने चारचाकी गाडीतून घरफोडीचे गुन्हे करीत. टोळीने अवघ्या सव्वा वर्षात शहर आणि परिसरात हे गुन्हे केले आहे.

आरोपींकडून विविध कंपन्यांच्या 13 चारचाकी, 5 दुचाकी, 38 किलो चांदी, 1 हजार 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सह आयुक्त रविंद्र शिसवे यांनी दिली. त्यांच्याकडून हडपसर पोलिसांनी नाकोडा ज्वेलर्स दुकानावर पडलेल्या दरोड्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्यात वापरलेली कार घेऊन ते हायवेकडे जात असल्याची माहिती हडपसर पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानूसार सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण त्यांच्या पथकासह मोरे वस्ती येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ दबा धरून बसले होते. पुलाखाली गाडी येत असतानाच त्यांना थांबवुन पकडण्यात आले. आरोपींना पकडत असतानाच पोलिस कर्मचारी प्रताप गायकवाड हे जखमी झाले.   

पैतरसिंगच्या वडिलांवरही दिडशे गुन्हे -
चोरीचा माल तिघाही आरोपींनी त्यांच्या घरी लपून ठेवला होता. यातील मुख्य आरोपी पैतरसिंग याच्यावर तो अल्पवयीन असतानाच 86 गुन्हे दाखल आहेत. तर मागील सव्वा वर्षात त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने आणखी 117 गुन्हे केले. पैतरसिंगच्या वडिलांवरही दिडशे गुन्हे दाखल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com