वृद्धाचा खिसा कापून चोरटयांनी लांबविली तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर दरम्यान घडला.

पुणे : गावाहून शहरामध्ये पीएमपी बसने येणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाचा खिसा कापून चोरटयांनी तब्बल पावणे दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी तळेगाव ढमढेरे ते चंदननगर दरम्यान घडला.

याप्रकरणी भाउसाहेब जिजाबा सातकर (वय 72, रा,सातककर वाडी, पारोडी तलेगाव, शिरुर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेतकरी असून ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता तळेगाव ढमढेरे-चंदननगर पीएमपी बसने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या शर्टच्या आतील कोपरीच्या खिशात त्यांनी पावणे दोन लाख रूपयांची रक्कम ठेवली होती. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन अनोळखी व्यक्तीनी त्यांच्या कोपरीचा खिसा कापून त्यातील रक्कम चोरुन नेली.

दरम्यान, बसमधुन उतरत असताना त्यांना आपल्या खिसा कापून त्यातील दोन लाखाची रक्कम चोरटयांनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी तत्काळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

Web Title: thief stolen 2 lack 75000 rupees from old age man pocket