सराईत चोरट्यास बारामतीत पोलिसांकडून अटक

baramati.
baramati.

बारामती शहर - मोबाईल व मोटारसायकल चोरणा-या सराईत चोरट्यास बारामती शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. बारामतीतून दोन मुलींच्या हातातून मोबाईल हिसकावून पळवून नेण्यात आला होता. या घटनेची गंभीरता लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. 

पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी या बाबत गुन्हे शोध पथकाला मार्गदर्शन केले. सहायक पोलिस निरिक्षक विकास बडवे, फौजदार सतीश अस्वर, पोलिस कर्मचारी रमेश केकाण, दादासाहेब डोईफोडे, स्वप्निल अहिवळे, रुपेश साळुंके, विजय वाघमोडे, राहुल पांढरे, सिध्देश पाटील, गणेश नांदे, राजेश गायकवाड, पोपट नाळे, बंडू कोठे, तुषार चव्हाण, बापूसाहेब बनकर, सुहास लाटणे यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरुन या प्रकरणातील संशयिताचा शोध सुरु केला. बारामतीतील शिवाजी चौकात तो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

या माहितीवरुन शिवाजी चौकात पोलिसांनी अमित शिवाजी गोसावी (वय 25, रा. खांडज, ता. बारामती) याला अटक केली. त्याने पल्सरवरुन येऊन दोन मुलींच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची कबूली दिली. 

दरम्यान त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने विविध भागातून पाच मोटारसायकली चोरल्याचेही कबूल केले. एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याची माहिती औदुंबर पाटील यांनी पत्रकारांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com