गस्तीची गाडी आली अन्‌ चोरट्यांनी धूम ठोकली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

वरवंड - वरवंड (ता. दौंड) येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा बॅंकेची गस्त घालणारी गाडी आल्याने चोरट्यांनी धूम स्टाइलने दुचाकीवरून पळ काढला. सीसीटीव्हीत एका चोरट्याचा तोंड बांधलेला चेहरा बंदिस्त झाला आहे. दरम्यान, चोरीच्या प्रयत्नाबाबत पोलिस चौकीत अद्याप तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरवंड परिसरात काही दिवसांपासून किरकोळ चोरीचे प्रकार वाढले आहेत. मागील आठवड्यात भरदिवसा चोरट्यांनी एका बंदफ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील तब्बल सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर मध्यंतरी रात्री एका घरासमोरील रिक्षाची चोरी झाल्याचा प्रकार घडला. शनिवारी (ता.26) मध्यरात्री चोरट्यांनी चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीतील एका सोन्याच्या दुकानाचे शटरचे कुलूप कटरने तोडून चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी सुरवातील दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. चोरीचा प्रकार सुरू असताना जिल्हा बॅंकेची गस्तीची गाडी चौकात आली. चोरट्यांनी त्यांच्याकडील दुचाकीवरून पलायन केले. संबंधित दुकानमालक दुकानात आल्यानंतर त्याला दुकानाच्या शटरचे कुलूप तोडल्याचे आढळले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मध्यरात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. एका चोरट्याच्या चेहऱ्यावर बांधलेले होते. त्यानंतर श्री गोपीनाथ विद्यालयाच्या फुटेजमध्ये दोन दुचाकींवरून चार चोरटे वेगात कडेठाण दिशेला गेल्याचे आढळले. पाटस चौकीचे सहायक फौजदार संतोष शिंदे, हवालदार मोहन देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Thieves escaped becasue of police petroling