बावधनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ 

संदीप घिसे 
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

पिंपरी : बावधन परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नऊ फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न केला. तर एका फ्लॅटमधील सव्वा सात लाखांचा ऐवज चोरून केला. ही घटना रविवारी (ता. 14) सकाळी उघडकीस आली. चेतन अनिल बर्डे (वय 38, रा. प्रेक्षा विहार सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान बर्डे यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सात लाख 33 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी त्याच सोसायटीमधील डॉ. अमेया सापटनीकर, संजय पाटील, अशोक प्रकाश पाठक यांचा शेजारील रॉयल ट्विन्स हाउसिंग सोसायटीमधील नीलेश फळ, जॉर्ज थॉमस, पिनॅकल गुलमोहर सोसायटीमधील नीलेश अरविंद देशपांडे, करण दिलीप बावीसी, अनिरुद्ध म्हसे, पद्मश्री क्‍लासिक सोसायटीमधील सुभाष ओझा यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरीचा प्रयत्न केला.

दरम्यान चोरीचा प्रयत्न झालेल्या काही फ्लॅटमधील रहिवासी गावाला गेले असल्याने ते आल्यानंतरच फ्लॅटमधील ऐवज चोरी झाला आहे का नाही, हे समोर येणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद पगारे यांनी सांगितले. चोरट्यांनी एकाच रात्रीत नऊ ठिकाणी चोरी केल्याने आसपासच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिंजवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Web Title: Thieves grew up in Bawdhan