चार घरे फोडूनही चोरट्यांचे हात रिकामे, कारण... 

thief
thief

निरगुडसर (पुणे) ; जवळे (ता. आंबेगाव) येथील शिंदे मळ्यातील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या घरांचे मालक बाहेरगावी राहत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

जवळे- शिंदेमळा येथे शुक्रवारी पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान चार ते पाच चोरट्यांनी डॉ. प्रकाश रामभाऊ शिंदे, (सध्या राहणार मंचर) राजेश बबन शिंदे (सध्या राहणार मुंबई), मारुती सदू शिंदे (सध्या राहणार अवसरी खुर्द), एकनाथ पिराजी शिंदे (राहणार जवळे) यांच्या बंद असलेल्या घरांची कुलपे तोडून घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त करत चोरी करण्याचा प्रयत्न केला.

याबाबतची माहिती कळताच पोलीस पाटील उत्तम शिंदे यांनी मंचर पोलिस ठाण्याला घटनेची माहीती दिली. त्यानुसार सहायक फौजदार चंद्रकात वाघ व पोलीस कैलास कड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस नवनाथ नाईकडे यांनी पंचनामा केला. या चोरीचा प्रयत्न झालेल्या घरांचे मालक बाहेरगावी राहत असल्याने घरातून नेण्यासारखा काही ऐवज नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com