पुणे : प्रवाशांची वाट पाहत थांबलेल्या कॅबचालकास चोरट्यांनी लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पुणे : प्रवाशांची वाट पाहत थांबलेल्या एका कॅबचालकास दुचाकीवरुन आलेल्या चोरटयांनी दमदाटी करत रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला. ही घटना सातारा रस्त्यावरील पंचमी हॉटेलसमोर सोमवारी मध्यरात्री घडली.

याप्रकरणी कॅबचालकाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खासगी कॅबचालक आहेत.

सोमवारी मध्यरात्री प्रवासी घेण्यासाठी ते पंचमी हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोघेजण आले. त्यांनी फिर्यादी यांना धमकी देत त्यांच्याकडुन रोख रक्कम व मोबाईल असा 25 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.

Web Title: thieves looted The cab driver who was waiting for the passengers