आणि चोरट्यांनी दूध डेअरीतून 20 लिटर दूध चोरुन नेले ! 

milk.jpg
milk.jpg

पुणे : चोरट्यांकडून मौल्यवान दागिने, वाहने, कपडे, कधीतरी किराणा मालाच्या दुकानातील वस्तु चोरुन नेण्याचे प्रकार घडतात. जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडतात. मात्र, दोन दिवसांपुर्वी हडपसर परिसरामध्ये दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने दूध डेअरीमधील 20 लिटर दूधाचे दोन ट्रे चोरुन नेल्याचा प्रकार घडला. त्यांना विरोध करणाऱ्या डेअरीमालकास मारहाण करीत धक्काबुक्की केली. 

Video : तृतीयपंथी चांदणी म्हणतेय, सत्ता आमच्या हातात द्या, सर्वांना सुतासारखं सरळ करू

याप्रकरणी प्रमोद नेवसे (वय 44, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे अमर प्लाझा येथे दूध विक्रीचे दुकान आहे. रविवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्याकडे आलेल्या दूधाचे वितरण करीत होते. त्यावेळी दुचाकीवरुन दोघेजण त्यांच्या दुकानामध्ये आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या एकाने फिर्यादी यांच्याकडे येऊन दूधाची पिशवी घेतली व ते तेथून निघून गेले.
"संगीतप्रेमींनो, तारीख नोंदवून ठेवा...सवाई गंधर्व महोत्सव 11 डिसेंबरपासून 
 

दरम्यान, काही वेळाने दोघेजण पुन्हा माघारी आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडील एक हजार 300 रुपये किंमतीच्या 20 लिटर दूधाचे दोन ट्रे चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना विरोध केला. मात्र त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करीत दूधाचे ट्रे घेऊन पळ काढला. या घटनेनंतर फिर्यादी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची चोरी चोरट्यांकडून केली जात होती. मात्र या प्रकारामुळे दूध चोरून नेण्याचा नवीन प्रकार पुढे आले. हडपसर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com