
काळुबाई मातेच्या मंदिरातील दानपेटीतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरी
Crime News : काळुबाई मंदिराच्या दानपेटीतील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
पुणे : काळुबाई मातेच्या मंदिरातील दानपेटीतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरी केला. ही घटना सहकारनगर येथील अण्णा भाऊ साठे वसाहतीमध्ये घडली.
या संदर्भात राजेश गद्रे (वय ४७, रा. लक्ष्मीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ मार्च ते ५ मार्चच्या दरम्यान मध्यरात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश यांचे आई-वडील सहकारनगर येथील अण्णा भाऊ साठे वसाहतीत राहतात. त्यांनी घरातच देव्हाऱ्यात काळुबाई मातेची मूर्ती स्थापना केली आहे.
चोरट्यांनी घराचाच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मूर्तीजवळ दानपेटीत ठेवलेले सोन्याचे अडीच लाख रुपयांचे दागिने आणि २५ हजारांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर शेंडे करीत आहेत.