राष्ट्रवादीच्या पुणे शहर महिला उपाध्यक्षपदी तृतीयपंथी

Pune
Pune

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेत पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर हा निर्णय घेण्याची भूमिका घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

काल महापालिकेच झालेल्या एका कार्यक्रमात महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिलीप बराटे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत चांदणी गोरे यांना उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

याबाबत सुप्रिया सुळे यांनी या पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले आहे. ''तृतीयपंथीयांना सन्मानाने जगणअयाचा हक्क आहे. या लोकांना अनेक जण गृहीत धरत नाहीत. तृतीयपंथीयांना समाजात योग्य ते स्थान मिळाले पाहिजे आणि समान संधी मिळाल्या पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे," असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबूक पेजवर म्हटले आहे.

याबद्दल बोलतान धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी तृतीयपंथी असलेल्या चांदणी गोरे यांची नियुक्ती पक्षाने केली आहे. शरद पवार साहेबांनी दिलेल्या सर्वसमावेशक, पुरोगामी विचारांच्या पक्षाचा एक कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com