पुण्यात दिवसभरात तिसऱ्यांदा गोळीबार; 'पीआय' जखमी

अनिल सावळे 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

पुणे : गुन्ह्याच्या तपासात आरोपीच्या मागावर असलेले गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर एका संशयिताने तीन गोळ्या झाडल्या. त्यात पवार हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आज (ता.21) सांयकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घटना रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन घडली. शहरात एकाच दिवशी सलग तिसऱ्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. 

शहरात बुधवारी (ता. 21) सकाळी वडगावशेरी येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील एकता ब्रिजेश भाटी या महिलेवर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयित हे रेल्वे स्थानकावर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमध्ये कार्यरत पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरात सापळा रचला.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

आरोपीला ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच एका संशयिताने पोलिस निरीक्षक पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून पोटात गोळी लागली आहे. जखमी पवार यांना तातडीने हॉस्फिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावर गोळीबारानंतर रक्ताचा सडा पडला होता. हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात जीआरपीच्या पोलिसांना यश आले आहे. आरोपी झेलम एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी एकाला पकडले आहे.

शहरात सकाळी वडगावशेरी, दुपारी येवलेवाडी आणि सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात तिसरी गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारांच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Third incident of firing in Pune; The police inspector was injured